- Home
- Blog
- HSRP Number Plate: एचएसआरपी नंबर प्लेटसाठी नोंदणी कशी करायची ? वाचा संपूर्ण प्रक्रिया
Technology
HSRP Number Plate: एचएसआरपी नंबर प्लेटसाठी नोंदणी कशी करायची ? वाचा संपूर्ण प्रक्रिया
HSRP Number Plate making Process: राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसविणे अत्यावश्यक असून 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांनाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जाणून घ्या एचएसआरपी नंबर प्लेट नेमकी कशी आणि कुठे बनवावी.
How to register HSRP online: केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट' High Security Registration Plates (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड आणि बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.
HSRP नंबर प्लेटचे फायदे (HSRP Plate Benefits)
✅ हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तोडल्याशिवाय काढता येत नाही.
✅ यात युनिक कोड आणि क्यूआर कोड आहे, ज्यामुळे वाहनाचा डेटा सहज उपलब्ध होतो.
✅ चोरी झाल्यास वाहन शोधणे सोपे होते.
✅ ही प्लेट हाय-रिझोल्यूशन कॅमेऱ्यांद्वारे पटकन वाचता येते.
✅ अपघात झाल्यास वाहन मालकाची संपूर्ण माहिती क्यूआर कोडद्वारे मिळू शकते.
जुन्या वाहनांवर एचएसआरपी लागू करण्याची प्रक्रिया
-
https://maharashtrahsrp.com/ या वेबसाईटला भेट द्या आणि एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग लिंकवर क्लिक करा.
-
Order Now या बटण ला क्लीक करा
-
त्यानंतर वाहन नोंदणी राज्य ,बसवण्याचे स्थान,HSRP ऑर्डर प्रकार,नोंदणीकृत पत्त्याचा पिनकोड,वाहन नोंदणी क्रमांक,वाहन चेसिस नंबर,वाहन इंजिन नंबर, वाहन मालकाचा मोबाईल नंबर टाकून verify with vahan बटण ला क्लिक करा.
-
वाहनाशी संबंधित मूलभूत माहिती वाहन प्रणालीमध्ये नोंदणीकृत मोबाईल क्रमांकासह भरावी.
-
एच एस आर पी लावण्यासाठी, तुमच्या सोयीनुसार एच एस आर पी फिटमेंट केंद्र निवडा.
-
तुमच्या सोयीनुसार एच एस आर पी स्थापित लावण्याची तारीख आणि वेळ निवडा.
-
एच एस आर पी शुल्क ऑनलाइन भरा, रोख पैसे देण्याची गरज नाही.
-
नियुक्त तारीख आणि वेळेवर एच एस आर पी फिटमेंट केंद्राला भेट देऊन तुमचा एच एस आर पी लावून घ्या.
HSRP नंबर प्लेटचे फायदे (HSRP Plate Benefits)
✅ हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तोडल्याशिवाय काढता येत नाही.
✅ यात युनिक कोड आणि क्यूआर कोड आहे, ज्यामुळे वाहनाचा डेटा सहज उपलब्ध होतो.
✅ चोरी झाल्यास वाहन शोधणे सोपे होते.
✅ ही प्लेट हाय-रिझोल्यूशन कॅमेऱ्यांद्वारे पटकन वाचता येते.
✅ अपघात झाल्यास वाहन मालकाची संपूर्ण माहिती क्यूआर कोडद्वारे मिळू शकते.
HSRP नंबर प्लेटची वैशिष्ट्ये
* होलोग्राम: अशोक चक्र असलेला हॉट-स्टॅम्प क्रोमियम होलोग्राम.
* लेसर-एच्ड पिन: कायमस्वरूपी ओळख क्रमांक.
* छेडछाड-प्रूफ स्नॅप लॉक: एकदाच बसवता येणारा लॉक.
* रिफ्लेक्टीव्ह शीटिंग: रात्रीही नंबर प्लेट सहज दिसेल.
HSRP नंबर प्लेट शुल्क
-
दुचाकी आणि ट्रॅक्टर: Rs. 450 + GST
-
तीनचाकी वाहन: Rs. 500 + GST
-
चारचाकी आणि इतर वाहन: Rs. 745 + GST
Scroll to Top