एक आरोग्याशी संबंधित योजना आहे. ज्याचे नाव 'आयुष्मान भारत योजना' आहे. या योजनेत लाभार्थ्यांना मोफत उपचार दिले जातात. तुम्ही देखील आयुष्मान कार्डधारक असाल आणि तुम्हाला तुमच्या शहरातील किंवा गावातील कोणत्या रुग्णालयात मोफत उपचार मिळू शकतात हे अश्या पद्धतीने जाणून घ्या..
या पद्धतीने पाहता येईल रुग्णालयाची यादी
* सर्वप्रथम pmjay.gov.in या योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल.
* येथे तुम्हाला 'फाइंड हॉस्पिटल' हा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
* यानंतर आपले राज्य, जिल्हा आणि रुग्णालयाचा प्रकार यासारखी उर्वरित आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
* त्यानंतर स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड भरा.
* आता तुम्हाला अशा रुग्णालयांची यादी दिसेल जिथे तुम्हाला मोफत उपचार मिळू शकतात.
लक्षात ठेवा..! जे हॉस्पिटल फॉर्म भरताना येणार तेच योजनेत आहे आणि जे येणार नाही ते योजनेत नाही.