Technology

तुमच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे 3000 रुपये अजून आले नाहीत | जाणून घ्या हे तीन कारण

 तुमच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे 3000 रुपये अजून आले नाहीत | जाणून घ्या 'हे' तीन कारण

 माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दोन महिन्यांचे एकूण 3000 रुपये मिळत आहेत. आतापर्यंत राज्य सरकारने तब्बल 80 लाख महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी हस्तांरीत केला आहे. पण काही महिलांना अद्याप सन्मान निधी मिळालेला नाही. याची काय कारणे असू शकतात हे जाणून घेऊ या

    
1. पहिले कारण
* राज्य सरकारने पात्र महिलांना पैसे देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. रक्षांबंधनाच्या अगोदर खात्यावर पैसे पडल्यामुळे अनेक महिलांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. 17 ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवून देऊ, असे आश्वासन राज्य सरकारने दिलेले आहे. त्याची प्रत्यक्ष सुरुवात 14 ऑगस्ट रोजीपासून चालू झालेली आहे. 15 ऑगस्ट रोजी साधारण 48 लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत. महिलांच्या बँक खात्यात 17 ऑगस्टपर्यंत पैसे येणार आहेत. त्यामुळे त्यासाठीची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. 17 ऑगस्टपर्यंत महिलांनी पैसे येण्याची वाट पाहायला हवी.

2. दुसरे कारण
* बँकेत पैसे जमा न होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण हे बँक सिडिंग स्टेटस आहे. बँक खाते आधार नंबरशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. 17 तारखेपर्यंत पैसे हवे असतील तर महिलांनी बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे गरजेचे आहे. आपला आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे. UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयीची माहिती जाणून घेता येते. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत.

3. तिसरे कारण
* तुम्ही अर्ज दाखल करूनही तुमच्या बँक खात्यावर पैसे आले नसतील तर घाबरण्याचे कारण नाही. तुमचा अर्ज फेटाळण्यात आल्यास तुम्हाला बँक खात्यावर पैसे येणार नाहीत. पण तुमच्या अर्जासमोर पेंडिग, Review, Disapproved, असं दिसत असेल तर घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या अर्जाची छाननी होत आहे. त्यामुळेच तुमच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. तुमचा अर्ज पात्र ठरवला गेला असूनही पैसे आलेले नसतील तर 17 तारखेच्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला पैसे मिळू शकतात.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना पैसे संबंधी प्रश्न उत्तर

१) आमचा फॉर्म अप्रवल झाला तरी पैसे आले नाही व बँक आधारला लिंक असून देखील पैसे खात्यावर जमा झाले नाही
उत्तर:- १६ व १७ तारखेपर्यंत राहिलेल्या महिलांना फॉर्म अॅप्रोहल झाला असेल व बँक खाते आधारला लिंक असेल तर पैसे जमा होतील

२)फॉर्म अप्रुव्हल झाला आहे पण आधारला बँक लिंक नाही तर काय करायचे
उत्तर:-ज्या बँकेत आपलं खात असेल त्या बँकेत जाऊन आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन NPCI मॅपिंग करून घ्या नाहीतर इंडियन पोस्टल पेमेंट बँक चे खाते ओपन करा

३) मी फॉर्म भरताना जे खाते दिले होते त्याच्यामध्ये पैसे न जमा होतात दुसऱ्या खात्यामध्ये जमा झाले?

उत्तर:-जे तुमच्या आधार कार्डला जे बँक खाते लिंक असेल त्याच खात्यावर पैसे जमा होतात तुम्ही दिलेल्या खात्यावर ते जमा होणार नाही

४)आधार बँक खाते लिंक आहे ते कसे चेक करायचे
उत्तर:-आधार कार्ड च्या साईट वरती जाऊन बँक सेटिंग चेक करून घ्या तिथे जे अकाउंट दिसेल ते अकाउंट आधार ला लिंक असेल जर तिथं इन ऍक्टिव्ह किंवा खाते दिसले नाही तर आपले आधार बँक ला लिंक नाही असे समजा


Quick View

[Best 8] Apps Like ThopTV In India Download – Free TV Streaming in 2021 | Mobile : Click here


Top 5 Apps To Recover Your Deleted Photos: Click here


Best Smartphones Under 15000 Rupees: Click here


Join LiveDeals Whatsapp Group
Join LiveDeals Telegram Channel
Visitor Online

Scroll to Top